मी जे पाऊल उचलले आहे.आपले आशीर्वाद या कार्यात या उपक्रमात सदैव राहोत. माझ्या पालघर ठाणे जिल्ह्यातील अति दुर्गम भागातील गाव पाड्यामध्ये खूप सारी मुलं कलेमध्ये पारंगत आहेत पण घरची परिस्थिती व शासनाच्या दुर्लक्षतेमुळे ह्या मुलांना आर्ट हा विषय कधीही शिकायला मिळणे कठीण आहे.विविध संस्था संघटना सुद्धा नक्की काय कामासाठी सुरू आहेत हे त्यांनाच माहीत पण मला या मुलांमध्ये असलेले टॅलेंट वाया जाऊ द्यायचे नाही या साठी मी स्वतः वेगवेगळ्या दुर्गम भागातील खेड्यातील परिस्थिती ने गांजलेल्या मुलांना एकत्र करून आर्ट क्राफ्ट शिकवणार आहे मग ती मुले कीतीही असली तरी मला चालतील.जर माझ्या गरीब गरजू मुलांना चित्रकला कार्यानुभव शिकण्याची इच्छा आर्ट शिकण्याची तळमळ असेल तर मला कनेक्ट असणाऱ्या ताई दादा पालक शिक्षक मित्र यांनी फेसबुक व्हाट्सअप वर मॅसेज करून मला ठिकाण गाव नक्की सांगा मी स्वतः माझ्या जॉब मधून वेळ काढून किंवा शनिवार रविवार त्या ठिकाणी येऊन त्या मुलांना साहित्यानिशी मोफत प्रशिक्षण देईन.तसेच या मुलां साठी आणखि काय केलं पाहिजे या साठी आपलं काही मार्गदर्शन असल्यास नक्की सांगा. या का...