गरजू मुलांना मदतीचा हात

मी जे पाऊल उचलले आहे.आपले आशीर्वाद या कार्यात या उपक्रमात सदैव राहोत.
माझ्या पालघर ठाणे जिल्ह्यातील अति  दुर्गम भागातील गाव पाड्यामध्ये खूप सारी मुलं कलेमध्ये पारंगत आहेत पण घरची परिस्थिती व शासनाच्या दुर्लक्षतेमुळे ह्या मुलांना आर्ट हा विषय कधीही शिकायला मिळणे कठीण आहे.विविध संस्था संघटना सुद्धा नक्की काय कामासाठी सुरू आहेत हे त्यांनाच माहीत पण मला या मुलांमध्ये असलेले टॅलेंट वाया जाऊ द्यायचे नाही या साठी मी स्वतः वेगवेगळ्या दुर्गम भागातील खेड्यातील परिस्थिती ने गांजलेल्या मुलांना  एकत्र करून आर्ट क्राफ्ट शिकवणार आहे मग ती मुले कीतीही असली तरी मला चालतील.जर माझ्या गरीब गरजू मुलांना चित्रकला कार्यानुभव शिकण्याची  इच्छा आर्ट शिकण्याची तळमळ असेल तर मला कनेक्ट असणाऱ्या ताई दादा पालक शिक्षक मित्र यांनी फेसबुक व्हाट्सअप वर मॅसेज करून मला ठिकाण गाव नक्की सांगा मी स्वतः माझ्या जॉब मधून वेळ काढून किंवा शनिवार रविवार त्या ठिकाणी येऊन त्या मुलांना साहित्यानिशी मोफत प्रशिक्षण  देईन.तसेच या मुलां साठी आणखि काय केलं पाहिजे या साठी आपलं काही मार्गदर्शन असल्यास नक्की सांगा.
या कार्यामध्ये मला शैक्षणिक साहित्याची आवश्यकता खूप आहे त्यासाठी  मदत करणाऱ्यांची सुद्धा मला मदत हेल्प हवी आहे त्यासाठी 7388926627 वर कॉल किंवा व्हॉट्सअप वर मॅसेज करा,.
धन्यवाद🙏

महेश काचरे सर
कलाकार महाराष्ट्र आर्ट सेंटर गोराड
Kalakar Maharastra, At Gorad,post kelthan, tel, Bhiwandi - Wada Rd, Gorad, Maharashtra 401204

*एलिमेंटरी व इंटरमिजीएट चित्रकला परीक्षेला पालघर ठाण्यातील आदिवासी भागातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल 12 ते 13 किलोमीटर अंतर अनवाणी परीक्षा केंद्रावर विना चप्पल चालत आलेले विद्यार्थी ,परीक्षेसाठी महेश काचरे यांच्या अथक परीश्रमातून ,कलाकार महाराष्ट्र व त्यांचे मित्र परिवाराच्या सहकार्याने दरवर्षी बसतात.
शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा राज्यात सुरू असून या परीक्षेस जे विद्यार्थी श्रीमंत तसेच आर्थिक दृष्ट्या चांगले आहेत व ज्याच्या शाळेत किंवा ज्यांना कला शिक्षक उपलब्ध आहेत असेच विद्यार्थी बसतात पण आदिवासी गरीब विद्यार्थ्यांना आवड असून बसता येत नाही हे महेश काचरे सरांनी प्रत्यक्ष विद्यार्थी दशेत असतानाच अनुभवलंय व ते स्वतः आदिवासी आहेत त्यामुळे तीच परिस्थिती आताच्या मुलांवर सुद्धा ओढवतेय त्यासाठी दरवर्षी त्यांच्या पालघर ,ठाण्यामधील, गणेशपुरी, वज्रेश्वरी,गाडगे आश्रम,कण्याविद्यालय,गोराड, म्हाळुंगे केलठण, नेवालपाडा, नांदनी, गायगोठा, आंबरभुई,घोटगाव,भिवाली,ऊसगाव,परिसरातील मुलांना त्यांच्या स्वतःकडून प्रत्येक विद्यार्थ्यवर साहित्यासाठी प्रशिक्षण वर्गासाठी 2013 पासून कोणाकडूनही कोणतीही मदत न घेता 500-1000प्रत्येक मुलावर खर्च करून तसेच त्यांना मोफत वर्षभर चित्रकला प्रशिक्षण देऊन वेगवेगळ्या परीक्षेत बसवतात व याचा फायदा मुलांना होत आहे मुलांचे 10 वि चे मार्क वाढले आहेत चित्रकलेची थोडीही माहिती नसणारे विद्यार्थी सुद्धा चित्र छान काढताना दिसत आहेत. या वेळी सुद्धा त्यांच्या कडून 100 मुलांना बसवले असून ही मुले आर्थिक दृष्ट्या भयंकर गरीब आहेत त्यामुळे एन परीक्षेच्या वेळी त्यांच्याकडे परीक्षेला लागणारे रंग ब्रश पॅड पट्टी पेन्सिल कँपोस पेटी पॅलेट आदी साहित्य उपलब्ध नव्हते.व  महेश यांच्या पर्सनल प्रॉब्लेममुले साहित्य नाही देऊ शकले त्यामुळे ही मुले परीक्षा कशी देऊ शकतील ही त्यांना खूप मोठी चिंता लागली होती. फक्त 1 दिवसात या मुलांना सर्व मदत करायची होती कसं शक्य तेव्हा त्यांनी मित्र परिवाराला एक मॅसेज पाठवला व तेही एका क्षणात मदतिला तयार झाले व कोणी आर्थिक साहित्यिक ज्यास जशी जमेल तशी मदत पाठवली साहित्य जमा झाले नकुल सुतार या मित्राने भूमिती या परीक्षा आज आहे तर मुलांसाठी 100 कँपोस पेटी आदल्या रात्री सर्व झोपलेले असताना 12 -1च्या दरम्यान उपलब्ध करून दिल्या मधुकर मरले यांनी कलर उपलब्ध करून दिले व आद्य आदिवासी क्रांतिसूर्य या ग्रुप मित्र परिवाराने आर्थिक मदत केली.या मुले आज अनवाणी 12-13 अंतर पायी चालत आलेले विद्यार्थी परिक्षा छान पैकी देत आहेत.
या सारखे उपक्रम महेश सरांणकडून कलाकार महाराष्ट्र कडून वर्षभर राबवले जात आहेत फक्त आपली एक मदत कोना गरीब मुलाला कलेचं पूर्ण शिक्षण मिळवून देऊ शकेल .त्यामुळे आपण ही अश्या कार्यामध्ये साहित्य व आर्थिक मदतीने या माझ्या मुलांना स्वतः सहकार्य करा. 

*साहित्या अभावी अति दुर्गम ग्रामीण भागातील मुलांनी चित्र काढण्यासाठी रंगपेटी ऐवजी अळूच्या पानाचा वापर केला साहित्य नसले तर काय झालं चित्रकला शिकणार म्हणजे शिकणार!!*😭
ज्या मुलांना पालकांकडून सहज सर्व काही उपलब्ध होते त्या मुलांना त्या साहित्याची काहीच कदर नसते.
ज्या ग्रामीण मुलांना  शिकण्याची धडपड इचछा आहे पण काय करणार शिक्षक नाही क्लासेस लावायला पैसा नाही स्वतः प्रॅक्टिस करावी तर साहित्य नाही अशा या परिस्थितीने गांजलेल्या मुलांना
तलमळीने शक्य  ती साहित्यिक
मदत  खालील पत्यावर पाठवू शकता.
           महेश काचरे सर कलाकार महाराष्ट्र अंतर्गत स्वता दुर्गम भागातील गाव खेडे पाड्यामध्ये काट्यातूत्यातून पायी जाऊन कोना व्यक्तीला रिक्वेस्ट करून एखादया घराच्या शाळेच्या ओटीवर मंदिरामध्ये झाडाखाली जेथे मुलांना बसण्यासाठी जागा उपलब्ध होईल तिथे ज्या मुलांना शिकण्याची इच्छया आहे अश्या मुलां पर्यंत स्वतः पोहचून त्यांना हवे ते कलेचे ज्ञान देण्याचा प्रयत्न करत आहेत.
          दोन दिवसांपूर्वीची घटना एका गावात ते गेले असता तेथील शाळेची ओटी शाळेतील शिक्षकांनी सुट्टीच्या दिवशी उपलब्ध करून सोबत सतरंजी सुद्धा दिल्या उपलब्ध झालेल्या ओटीवर वेगवेगळ्या पाड्यांमधून तळमळीने दूर दूरवरून चालत शिकण्यासाठी आलेली मुले बसवून त्यांना शिकविणे सुरू केले .पण साहित्य कोणाकडे दिसत नव्हते त्या मुळे चित्रकला कागद पेन्सिल वैगेरे साहित्य मुलांना स्वतः देऊन छान पैकी पेंसिलचे रेखाटन सर्वांचे काढून घेतले चित्र झाले .आता रंगविणे बाकी होते  रंगवण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडील थोडेफार कलर वैगेरे  होते ते सुद्धा काही मुलांना देऊन टाकले मुलांनी रंगवायला सुरवात केली अशातच कोपर्यामध्ये असलेल्या मुलांकडे त्यांचे लक्ष गेले काही मुली फक्त याच्याकडून त्याच्याकडून कलर घेताना दिसल्या व पुढे एक आचर्यकारक गोषट दिसली चक्क त्या मुलींकडे रंग पॅलेट नसल्यामुळे झाडाची अळूची पाने त्यांनी आणली होती व त्यावर ते रंग गोळा करून  ते रंग मिक्स करत होते यावरून त्याची शिकण्याची जिद्द चिकाटी दिसून आली ते पाहून त्यांचे मन भरून आले मुले चित्र शिकण्यासाठी काय काय करतात . या अश्या गरजू मुलांसाठी जे काही त्यांना शक्य आहे ते करण्याचा अतोनात प्रयत्न करत राहतील यासाठी साथ हवी आहे तुमच्या आधाराची सहाय्यतेचि तुमची छोटीशी उदा.(पेन्सिल खोडरबर पट्टी,पेपर,रंग ,पॅड,स्केचपेन,बॅग,कँपोस, वही,फेव्हीकॉल,कैची, कटर)आर्थिक साहित्यिक मदत या गरजू मुलांना हवे ते ज्ञान मिळवून देऊ शकतील या ज्ञान दानामध्ये तुमचा सुद्धा हातभार लागेल.एक दिवस मंदिर मध्ये नका जाऊ अश्या मुलांना शिकवा वाढदिवस या मुलांवर खर्च करून साजरे करा.ही मुले आपणास कधीच विसरू शकणार नाही एक खर सुख समाधान तुम्हाला मिळेल
कळकळीची विनंती 🙏🏻
       मुलाची शिकण्याची धडपड इचछा आहे पण काय करणार शिक्षक नाही क्लासेस लावायला पैसा नाही स्वतः प्रॅक्टिस करावी तर साहित्य नाही अशा या परिस्थितीने गांजलेल्या मुलांना
तलमळीने शक्य  ती साहित्यिक
मदत  खालील पत्यावर पाठवू शकता.
     किंवा
7387926627 या नंबर वर कॉल  व्हाट्सएप मॅसेज करा जेव्हा मला मदतीची आवश्यकता भासेल तेव्हा तुमचे  सहकार्य या कार्यास लाभेल.
धन्यवाद.🙏🏻

महेश रामचंद्र काचरे
गाव- गोराड,कलाकार महाराष्ट्र आर्ट सेंटर गोराड ग्रामपंचयत समोर,पो केलठण,ता वाडा, जि पालघर ,पिन नं 401204
मो नं 7387926627

महेश काचरे सर पालघरवरून 24/11/2018 रोजीकोशिंमशेत (वाडा)गावातुन जात असता त्यांना परिसरात  धुलीने माखलेली मुले मातीवर काठीने चित्रे रेखाटताना दिसली .क्षणाचाही विलंब न करता ते त्या गावात गेले सर्व मुलांना एकत्र बोलवले खूप मुलं क्षणात जमा झाली प्रत्येकाला विचारले चित्रकला वही रंग तुमच्याकडे आहेत का सर्वांचा नकार आला साहित्य तुम्हाला दिल्यावर चित्रकला शिकणार का असे ते बोलताक्षणी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक विलक्षण स्माईल आली मग त्यांनी त्या मुलांना उद्या 5 वाजता सर्वानी एकत्र जमा मी तुम्हाला शिकवेन असे सांगीतले व घरी आले त्यांच्याकडे साहित्यासाठी लागणारी रक्कम खूप कमी पडत होती,काय करावे सुचेना मोबाईल मधील आपल्या कलाकार महाराष्ट्र ग्रुप नंबर83    मधील एका नंबर वर सहजमॅसेज केला की साहित्याची आवशयकता आहे, ती व्यक्ती कोण कुठची  काहीच माहिती नव्हती, नंतर समजले नंबर शिक्षिका सौ.सुजाता किरण गेंगजे. यांचा होता राहणार. सातारा  त्यांनी कोणताही विलंब न करता कोणताही प्रश्न न विचारता या कार्यासाठी होकार दर्शविला.एक क्षणात ओळख पाळख नसताना एवढा मोठाविश्वास दाखवला यातच सरांना परमेश्वराने सर्वकाही दिल्याची पावती मिळाली त्या मॅम साताऱ्याहुन पालघरला स्वतः साहित्य घेऊन येऊ शकत नव्हत्या त्यामुळे त्यानी आर्थिक मदत ऑनलाइन करून या कार्यास हातभार लावला आज संध्याकाळी 5 वाजता मुलांना एकत्र जमायला सांगितलं होत मुलं एक तास आधीच येऊन राहिली होती व रस्तावर येऊन येऊन पाहत होती असे ग्रामस्थांनी सांगितले ते जेव्हा गेले तेव्हा मुलं आनंदाने ओरडत धावत पळत ते जिथे थांबले तिथे जमा झाले 80 च्या वर मुलांनी त्यांनी घेरलं होतं ,एवढी सर्व मुले कुठे बसवायची हा प्रश्न पडला होता सगळी कडे धूळ होती घरं छोटी छोटी कुडा मातीची , सतरंजी सुद्धा नसल्यामुळे मुलांना बाजूच्या शेतामधेच बसवले व मुलांना आर्ट शिकवण्यास सुरुवात केली मुले फर्स्ट टाइम हे सर्व करत शिकत होती पालक ही एक एक येऊन आपल्या मुलांना पाहत होते व ते स्वतःही, शिकवत असलेले करून पाहत होते मुलं सर्व गुंतून गेली होती अंधार होऊ लागला त्यामुळे शिकवणं  बंद करून प्रत्येक मुलाला ड्रॉईंगबुक,पेन्सिल,पट्टी,शॉर्पनर,ऑइल,
पेस्टल रंग,व्हाटर कलर,पॅड,कँपोस बॉक्स,पेन,क्राफ्ट पेपर,हे साहित्य 67मुलांना दिले,व सुट्टीच्या दिवशी मी तुम्हाला येऊन शिकवेन  असे सांगितले,अंदाजापेक्षा मुलांची संख्या खुप वाढली होती त्यामुळे 20-30 मुलांना साहित्य देता आले नाही पुढच्या रविवारी साहित्य देईन असे सांगून त्या मुलांचा गोड निरोप घेतला.

*अशी खूप सारी गावं आहेत तेथील मुलं शिकण्यासाठी आतुर आहेत.पण परिस्थिती नाही*.
*(आपलीही अशी मदत करण्याची इचछा असेल तर मला नक्की 7387926627 व्हाट्सअप मॅसेज करून सांगा किंवा खालील पत्यावर साहित्य पाठवा.)*
धन्यवाद.
भावेश रामचंद्र काचरे सर
कलाकार महाराष्ट्र आर्ट सेंटर,
मु.गोराड,पो.केलठण,ता.वाडा, जि पालघर 401204
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
~

दरवर्षी ज्या शाळेमध्ये कला शिक्षक नाहीत असल्या जिल्हा परिषद शाळा हायस्कुल, प्रायव्हेट स्कूल, परिस्थिती नसलेले 500 च्या वर मुलांना एलिमेंटरी इंटर्मिजीएट परिक्षेला कलाकार महाराष्ट्र कडून मोफत बसवण्यात येते त्याच बरोबर त्याना साहित्य उपलब्ध करून प्रशिक्षण देण्यात येते त्याच बरोबर मिळणार सर्टीफेकीट त्यांच्या घरी पोहोच करण्यात येते आज हजारो मुलांना 10 वीच्या परीक्षेत या मुळे खूप फायदा झाला आहे.

Comments

Popular posts from this blog

महेश काचरे सरांविषयी

गरजु मुलांसाठी संगनक