सामजिक उपक्रम (जल)
नदीवर श्रमदानाने बंधरा बांधून केली दिवाळी साजरी
ही प्रेरणा घेऊन आज बऱ्याचश्या गाव खेड्यात आपल्या परिसरामध्ये बंधारे बांधतील. गोराड गावातील सर्व ग्रामस्थांचा दिवाळीचा पहिला दिवसाचा सण रोजच्या सारखा असायचा पण या वर्षी हा सण एक वेगळ्या प्रकारे साजरा करावा असे सर्व गावकऱ्याच्या सहमतीने ठरले उन्हाळ्यामध्ये नदी कोरडी पडते त्या मुळे भीषण पाणी टंचाई जाणवते या वर उपाय म्हणून नदीवर बंधारा बांधावा असे ठरले व दुसऱ्याच दिवशी दिवाळी सण अनोख्या पद्धतीने साजरा केला.सर्व लोक गोराड गावातील तानसा नदीवर श्रमदान करून दगड मातीने लांबच लांब बंधारा बांधला या मध्ये लहान मुलांपासून सर्वानी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला महिलांचा सहभाग या मध्ये मोठया प्रमाणावर होता.
या कार्यामुळे वर्षभरात नदीवरील पाणी आटू शकणार नाही. व याचा फायदा सभोवताली असलेले गणेशपुरी,निंबवली,गोराड,हे गाव,तसेच नित्यानंद कॉलनी,मातेरा पाडा, गांधी पाडा, कोचेचा पाडा तसेच आजूबाजूचा परिसरातील सर्व पाडे खेडे गाव या सर्वानाच याचा लाभ होईल, या भागात रोज फिरण्यासाठी येणारे पर्यटक याना सुद्धा हा परिसर सुंदर बघायला मिळेल. तसेच महत्वाचे या भागात पाण्याची पातळी आता स्थिर राहून आजूबाजूच्या परिसरात भागात पाणी टंचाई सुद्धा मोठ्या प्रमाणावर जाणवणार नाही.या उपक्रमात महेश काचरे कला शिक्षक ,गावचे सरपंच मछिंद्र काचरे, ग्रामपंचायत सदस्य संगीता काळे, भाग्यश्री काचरे,पूजा मढवी ,कला शिक्षक भावेश काचरे, पुंडलिक मढवी, अंगणवाडी सेविका रविता भोईर, योगेश भगत,दीपक फुलारे, रामचंद्र काचरे,समीर दनाने,सुदाम काचरे,अनुसया काचरे,करुणा घरत तसेच गोराड गावातील सर्व महिला बचत गट,ग्रामपंचायत सदस्य, सर्व गोराड ग्रामस्थ,या सर्वांनी खूप कष्ठाने मेहनतीने उत्साहाने हा कार्यकम सफल केला.व अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी करून आनंद व्यक्त केला.
Comments
Post a Comment