महेश काचरे सरांविषयी
*मूर्ती लहान कीर्ती महान* महेश रामचंद्र काचरे सरांविषयी सर्व विद्यार्थी मित्रांचे गावातील मुलांपासून पंचक्रोशीतील मुलांचे आवडते लाडके शिक्षक म्हणजे महेश काचरे सर पालघर मधील वाडे तालुक्यातील अत्यंत दुर्गम अस्यां गोराड गावामध्ये राहत असलेले जेथे लाईट रस्ते वाहने अस्या कोणत्याही सोइ सुविधा नसलेल्या कुडा मातीची घरे गवताचे छप्पर अशी घरे असणारा 100 %आदिवासी वस्ती असणाऱ्या गोराड गावात बालपण अस्यां गावामध्ये आई वडील अशिक्षित पण 4 भावंड शिकावे म्हणून खूप मेहनत कष्ट गरिबीची झल सुद्धा लागू न देता काबाड कष्ट करत जे काही करता येत ते त्यांच्या परीने करत रात्री लाईट नसल्यामुळे रॉकेलच्याबत्ती वर अभ्यास पण वर्गात प्रथम क्रमांक हमखास कोणतीही स्पर्धा असो परीक्षा असो सहभाग व बक्षीस असायचेच त्यामध्ये कलेची खूप आवड पण शिक्षक साहित्य नसल्यामुळे काहीही करता येत नव्हते मग जिथे संधी मिळायची तिथे आपली कलाकारी दाखवून द्यायचे गावात जिल्हा परिषद शाळा 4 थी पर्यंत त्या नंतर 5 किलोमीटर रोज पायी प्रवास करत केलठण इथे 7 वि पर्यंत शिक्षण पुढे अकलोली येथे 10 करून झिडके येथे कॉलेज करून आपल्या आवडत्या कला विषयात वसई द्रुककलाकॉलेज मधून संपूर्णमहाराष्ट्रातून १ ल्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन कला शिक्षण घेऊन कला शिक्षक बनले,कला शिक्षक बनल्या बनल्या खुपस्या वेगवेगळ्या शाळेवर कार्य केले पण यामध्ये लहान पनापासून आई वडिलांच्या घडवलेल्या चांगल्या सवयीनमुळे मदत करायची जी सवय बालपणापासून लागली होती ती आज एक रुद्र रूप घेऊन पुढे आली 2013 पासून जि प शाळेत नियुक्ती मिळाल्यानंतर जे बालपणामध्ये त्यांना स्वतःला आर्ट शिकता आले नाही ते त्यांच्या आदिवासी प्रत्येक मुलाला मिळावे यासाठी ते स्वतः शाळेची सुट्टी झाल्यावर किंवा शनिवार रविवार जंगल पाड्यात खेड्यात दुर्गम भागात चालत फिरून मुलाना एकत्र करतात व त्यांना मोफत साहित्य देऊन आर्ट क्राफ्ट शिकवतात यासाठी त्यांना हॉल वर्ग घर काहीही लागत नाही निसर्ग हाच त्यांचा मोठ्ठा हॉल आहे,पुढे मुलांना वेगवेगळ्या परीक्षा,स्पर्धाना समाविष्ट करायला सुरुवात केली,हळू हळू महाराष्ट्रातील एक एक कला शिक्षक ,कलाकार,यांच्याशी संपर्क येत गेला त्यामुळे वेगवेगळ्या शाळेमध्ये बोलावणे येऊ लागले खूप ठिकाणी जाणं येणं सुरू झालं दिवसभरातून 2000,3000,मूलांना कला शिक्षण देऊ लागले,यात व्हाट्सअप फिचर निघाले त्यामुळे सर्व माझ्या 1 लाखाच्या वर संपर्क असणाऱ्या कला शिक्षक जीप शिक्षक यांचे कलाकार महाराष्ट्र समूह तयार करून सकाळ पासून मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम मोबाईल द्वारे महाराष्ट्रात पाठवू लागले व ते शिक्षक त्यांच्या शाळेत उपक्रम घेऊ लागले त्यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष किती मुले आज कला क्राफ्ट शिकतात या मुलांच्या संख्येचा आकडा सांगणे एक कठीणच. मोठ्या हालाखीने कला शिक्षण घेऊन विद्यार्थी दशेत असल्यापासून त्यांनी जे मुलांना कला विषय शिकवायचे सुरु केले ते आत्तापर्यंत अखंड सुरु आहे या प्रत्येक कार्यात सदैव त्यांचे छोटे भाऊ भावेश रामचंद्र काचरे वय20 वर्ष क्राफ्ट शिक्षक यांचा मोलाचा सहभाग असतो. नेहमी प्रसिद्धीपासून दूरच असतात. कधी कधी आदिवासी ग्रामीण भागातील 500-1000 मुलांना आर्ट साहित्य देणे एक आव्हान असते त्यावेळी संपर्कात असलेले त्यांचे मित्र शिक्षक त्याक्षणी मदतीसाठी धावून येतात. आज ते मॊज मजा करण्याच्या वयात 25-26 वर्षाचे असुन सुध्दा एवढे खुप मोठे अद्भुत कार्य गावात समाजात महाराष्ट्रात कला क्षेत्रात करत आहेत, तुमच्यामध्ये हि व्यक्ती रोज वावरते आहे पण असं असतांना तुम्ही त्यांना आेलखु शकनार नाही एवढी साधी सरल व्यक्ती आहे मुले म्हणजे त्यांचा जीव कि प्राण मुलांसाठी असणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांना ते मुलांना माहिती प्रशिक्षण देऊन स्वतःच्या खर्चाणे विद्यार्थांना स्पर्धांना परीक्षेला बसवतात या मुळे विद्यार्थी वर्गाला सरांकडून खूप काही शिकण्यासारखे मिळते ,हि महान व्यक्ती जे स्वार्थी कलाकार केस पांढरे झालेल्यांना एक सनसनीत चपराक आहे बरेचसे कलाकार खुप मोठे होवुन नावारुपाला आले पन त्यांनी त्यांची कला इतरांना कधीच शिकवली नाही फक्त हार तुरे घेन्यामध्येच स्वतःचा विचार केला , एकमेकांचा द्वेष ,मी सर्वात मोठा कलाकार माझ्या पुढे कोणी गेला नाही पाहिजे असे इगो वाले कलाकार पाहून त्यांना खूप वाईट वाटते . महेश सर त्यांना जे काही कलेमधले माहीती आहे किंवा ते शिकवतात ते कोनताही मागचा पुढचा विचार न करता लहानांपासुन थोरांनपर्यत कोनालाही निस्वार्थी मानाने देतात, दरी खोरयांमधील कलाकारांची व गरीब गरजू विद्यार्थ्यांची ते स्वत प्रसीध्धी करतात कधीही स्वतःच्या प्रसीद्धीचा ते विचार करतांना दिसत नाही. तुम्हाला अनेक व्यक्ती संस्था समाजसेवा करताना दिसत आहेत पण त्यांच्या त्यामागे काहीतरी स्वार्थ असतोच पण महेश सरांचा स्वार्थ फक्त आणि फक्त गरीब गरजु मुलांना कला शिकता याव्यात जे लहान असतांना त्यांना शिकायला नाय मिलाले अशी वेळ आत्ताच्या विद्यार्थी्यावर न येवो यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रातील कलाकार कला शिक्षक याना रोज नवीन नवीन कला प्रकार शिकवत असतात या साठी त्यांनी सोशल साईड वर अनेक समुह तयार केले आहेत निस्वार्थी कलाकारांच्या टीम बनवल्या आहेत व ते टीम मेम्बर रोज त्यांच्या विविध कलाकृतींचे नमुने हजारो कलाकारांना देत असतात समुहामध्ये महाराष्ट्रातील जि.प.मनपा प्रायव्हेट शिक्षक,कला शिक्षक कलाकार सर्व क्षेत्रातील व्यक्तीकनेक्ट आहेत एवढेच नाही तर विविध क्षेत्रातील अधिकारी मीडिया सुद्धा कलाकारांचे अविष्कार बघण्यासाठी समाविष्ठ आहेत. एकमेकांपासु दुर चाललेले कलाकार सुद्धा एकत्र करन्यामध्ये त्यांचा आटापीटा धडपड चालु आहे. या मधून वेगवेगळ्या कलाकृती मुलांसाठी सर देत असतात कलाकारांना सुद्धा महेश सरांमुळे खूप मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
Comments
Post a Comment