गरजु मुलांसाठी संगनक

आज माझ्या भागातील गरीब गरजू मुलांसाठी एक कॅम्पूटर उपलब्ध झाला दहिसर मधील  शाळेतील कम्प्युटर सहशिक्षिका मनीषा पाटील यांनी माझं गरीब गरजू मुलांसाठीच कार्य पाहून आपण ही काहीतरी या मुलांसाठी करावं हा पाझर त्यांच्या मनात फुटला त्यांनी त्यांच्या घरातील आपल्या मुलाचा कम्प्युटर द्यायचे ठरवले हा सर्व कम्प्युटरचा सेट दहिसर ते गोराड न्यायचा कसा हा मला खूप मोठा प्रश्न पडला होता विचार केला की शाळा सुटल्यावर एक एक पार्ट घेऊन जाऊ पण त्यांच्या सरांनी कम्प्युटर असा काही पॅक केला की एकाच वेळी सर्व सेट जाईल खूप छान वाटले मग तेथून हा सेट मेन रोड पर्यंत पायी त्यानंतर रिक्षाने रेल्वे स्टेशन पर्यंत,पुन्हा रिक्षा स्टँड ते प्लॅटफॉर्म वर दोन्ही हातात व पाठीवर बॅग असा सर्व सेट घेऊन ट्रेन मध्ये चढलो ट्रेन मध्ये खूप गर्दी होती खाली ठेवायलाही जागा नाही हातामध्येच पकडून हळू हळू आतमध्ये शिरत गेलो व एका व्यक्तीला आग्रह करून सीट च्या खाली सर्व साहित्य ठेवायला सांगितले त्यानेही लगेच मदत केली व साईडच्या बऱ्याच व्यक्तींनि समान त्याच्या पर्यंत पोचवायला मदत केली मग वसई ला  उतरून तेथून चालत महानगरपालिका बस पकडून माझ्या ताईकडे भिवाली गाडगे आश्रमला आलो व हा सर्व सेट माझ्या गाडीमध्ये ठेऊन घर गाठलं ब्रश रंग खडू पकडायच्या हातानी हे आज वजन उचलल्याने दुसऱ्यादिवशी हात खूप दुखू लागले होते हात कोपरामध्येसुद्धा फोल्ड होत नव्हते खूप त्रास होऊ लागला शनिवारी शाळेतून लवकर घरी आल्यावर हा जी जी मुलं खूप गरजू आहेत त्यांच्या पालकांना जाऊन भेटलो व  मुलांना पालकांना वेळ वार सांगून कॅम्पूटर शिकण्यासाठीची परवानगी घेतली व मुलांच्या सोबतीने कम्प्युटरच्या एक एक पार्टची माहिती देत कॅम्प्युटर जोडला मुलांनाही भागांची माहिती झाली पुढे  एक एक टूल समजावत शिकवण्यास सुरुवात केली मुलांना प्रत्यक्षरीत्या शिकताना पाहून जी मुलांसाठी मेहनत घेत आहे त्याच खरं मानसिक समाधान प्राप्त झालं मुलांचेही चेहरे आनंदाने फुलून गेले होते जे नवीन कार्य माझ्या कडून सुरू झालं ते असंच जोमाने सुरू राहो व असेच खूप साऱ्या मुलांना कम्प्युटर शिकवता शिकता यावे या साठी आणखी अशीच मनीषा मॅडम सारखी मुलांसाठी आपलं खरं प्रेम व्यक्त करणारी खरा मानवतेचा संदेश देणारया माणसांची भेट होत राहो व या माझ्या गरजू गरीब मुलांसाठी कम्प्युटर,शाळेतील साहित्य,चित्रकलासाहित्य,वेळोवेळी मुलांना जे जे लागणार सहकार्यप्राप्त होवोत व मुलांची झपाटयाने प्रगती होवो व हे कार्य कुठेही खंड न पडता अखंड चालत राहो हीच देवाकडे प्रार्थना.🙏

Comments

Popular posts from this blog

गरजू मुलांना मदतीचा हात