गरीब गरजू मुलांसाठी परीक्षा माझा उपक्रम
आता एलिमेंटरी व एंटमिजीएट च्या परीक्षाची तयारी सुरू झाली की माझ पहिलं पाऊल पडते ते ज्यांना कलेबद्दल आवड पण माहिती कोणीही देत नाहीत,शाळेत जातात पण कला शिक्षक नाहीत,कुठेतरी डोंगरात,खेड्यात गावात दुर्गम भागात राहतात त्यामुळे ड्रॉईंग साठी कोणते साहित्य असत तेच माहीत नाही चित्रकला कोणाकडे शिकायचं म्हटलं तर महिन्याचे 5000 हजार कुठून आणणार आर्थिक परिस्थिती बिकट त्यामुळे क्लासेस फी भरू शकत नाहीत बिचारी इचछा जिद्दअसून टॅलेंट असून काहीही करू शकत नाहीत या मुलांनाही शिकण्याचा अधिकार आहे मी सुद्धा याच परिस्थितीतून गेल्यामुळे ह्या असल्या मुलांसाठी 2013 पासून पाऊलउचलुन ही जी आदिवासी ,गरीब,गरजू मुलं आहेत ती खेड्या पाड्यात दुर्गम भागात जाऊन शोधायची प्रत्यक्ष त्यांच्या घरी जायचं घरी गेल्यावर पालकांशी संवाद साधायचा त्याच्याशी बोलल्यावर घरची परिस्थिती काय आहे सर्व समजते त्यानंतर त्यांचे परीक्षा फॉर्म भरण्यास सुरुवात करायची ही मुलं आधीच गरीब त्यामुळे यांच्याकडून कोणतीही परीक्षा फी ची अपेक्षा करणे दूरच फॉर्म भरण्यासाठी लागणारे पासपोर्ट साईझ फोटो सुद्धा त्यांककडे 101%नसताततच त्यामुळे प्रत्येक मुलाचा माझ्या मोबाईल मध्ये फोटो काढून फोटो च्या दुकानातून स्वतः खर्च करु न काढून आणावे लागतात. तीन फोटो घेऊन उरलेले सर्व फोटो मुलांना देऊन टाकतो ते त्यांना पुढे काहीही कामासाठी वापरता येतात काही पालक फी ची व्यवस्था कसेतरी आपले 2 वेळची उपासमार करून करतात पण काहीची घरची परिस्थिती फारच खराब त्यामुळे त्यांचा खर्च मलाच उचलावा लागतो नाहीतर ते विदयार्थी इचछा असताना परीक्षेस बसवण्यास नकार देतात काही वेळेला माझे मित्र आर्थिक सहकार्य करतात त्यामुळे थोडंफार हे सर्व करण्यास एक फार मोठा आधार मिळतो.फॉर्म भरून झाले की खरी लढाई सुरू होते माझा घर,जॉब यांमधून वेळ काढून बसवलेली मुलं ज्या ज्या भागात एकत्र करता येतील तेवढी करायची आणि पावसाळा असल्यामुळे बाहेर बसू शकत नाही म्हणून कोणाच्या तरी घरात हाता पाया पडून थोडा वेलासाठी परमिशन घ्यायची त्या घरातील कोणाला त्रास होऊ नये म्हणून आत मध्ये मुलं न नेता ओटीवरच बसवायची याआधी मुलांचा चित्रकलेशी कधीच संपर्क आलेला नसल्यामुळे मुलांना चित्रकला सुरुवातीपासून शिकवने सुरू करावं लागतं बाहेर धो धो पाऊस व एखाद्या घराच्या आेटीवर जून,जुलै,ऑगस्ट सप्टेंबर हे मोफत ज्ञान दान सुरु असतं शिकवताना जेव्हा मुलांची चित्र काढण्यास सुरुवात होते तेव्हा कोणाकडेच साहित्य नसतेच गेल्यावर्षी काही मुलींनी रंग आनले पण प्लेट च्या जागी चक्क मोठी अळूची पानं आणि स्वतः तयार केलेले एक बाजू ठेचलेल्या बांबूच्या काड्या त्यांचे ब्रश ते पाहून अगदी योग्य मुलांसाठी मी ही मेहनत घेत आहे याच समाधान वाटत मुलांकडे साहीत्य नसल्यामुळे व मलाही 100-200मुलांना एकदम साहित्य देणे शक्य नसते त्या वेळी माझ्या संपर्कात असलेल्या माझ्या शिक्षक मित्रांना विद्यार्थ्यांची सर्व परिस्थिती सांगितल्यावर कशीबशी आर्थिक मदत होते त्यामधून प्रत्येक मुलासाठी ड्राईंग पॅड, चित्रकला वही, व्हाटर कलर, ब्रश, कंपास बॉक्स, पॅलेट,मोठी पट्टी, ऑईल पेस्टलरंग,स्केचपेन,पेन्सील,शॉर्पनर,खोडरबर,आदि साहीत्य उपलब्ध करुन देतो त्यातच ही मुले 15-16किलोमीटर परिक्षा केंद्रावर अडवानी चालत येतात त्यामुळे त्यांचा प्रवास खर्च जान्या येन्याची व्यवस्था करावी लागते या सर्व माझ्या मेहनतीने मुलं छान परीक्षा देतात व जेव्हा सर्टिफेकेट येतात तेव्हा पुन्हा ती देण्यासाठी रान वन खेडे पालथे घालावे लागते व त्या बसवलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र द्यावे लागते.या सर्व कार्यात माझ्या छोट्या भावाची खूप खूप मदत होते.
महेश रामचंद्र काचरे
7387926627
कलाकार महाराष्ट्र प्रोजेक्ट
गाव-गोराड,पो-केलठन,ता-वाडा जि-पालघर,
Comments
Post a Comment