चिमुकल्या बचचे पार्टीचा रखरखत्या उन्हात सीड बॉल पर्यावरण उपक्रम
पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
चिमुकल्या बचचे पार्टीचा रखरखत्या उन्हात सीड बॉल पर्यावरण उपक्रम
पर्यावरण रक्षणासाठी पर्यावरण दिनाचे अवचित्य साधून भर रखरखत्या उन्हात उन्हाची पर्वा न करता पालघर मधील वाडा तालुक्यातील छोट्याश्या गोराड येथील छोट्या छोट्या चिमुकल्यानी आपल्या महेश काचरे यांच्या सोबत सभोवतालीच्या विविध झाडाच्या खूप साऱ्या बिया गोळा केल्या त्यानंतर माती आणि शेणखताचे समप्रमाणात मिश्रण केले...त्यात पाणी घालून पिठासारखे मळून घेतले छोटे-छोटे गोळे करून त्यात बिया घातल्या...त्याला हाताने बॉलसारखा आकार दिला...त्यानंतर काही वेळातच तयार झाले खूप सारे सीड बॉल! हे सीड बॉल सुकवून ते जंगलात पेरून टाकले
अश्या प्रकारे सीड बॉल बनवून ते जंगलात पेरून गोराड मधील चिमुकल्यांचा पर्यावरण संवर्धनासाठी केलेला सर्वाना छान प्रेरणा देणारा भन्नाट उपक्रम.
लिंक वर क्लिक करून विडिओ नक्की पहा👇🏻
https://youtu.be/a92BqNt33HQ
Comments
Post a Comment