रोज मुलांच्याएकएक साहित्यासाठी माझी धडपड का????
रोज मुलांच्याएकएक साहित्यासाठी माझी धडपड का????
2012 मध्ये मी शाळेवर जॉईन झालो त्याच बरोबर दुसऱ्या शाळांवर जिल्हा परिषदेत कला शिक्षक नसल्यामुळे मी जायचो तेव्हा कला विषय म्हणजे काय हेच मुलांना माहीत नव्हते वर्ग 7विचा मी मुलांना चित्रकला वही आणायला सांगितले दोन तीन महिने झाले तरी सर्व मुलांनी चित्रकला वही काय आणली नव्हती सांगून ओरडून एकदाच्या वह्या आल्या पण कलर नाय आले मग काय पेंसिल पेन नेच रंगकाम चालायचं, पण यातील एक मुलगा रोज सांगायचा वहीउद्या आणेन उद्या आणेन पण रोज इतरांच्या वह्या घेऊन मी शिकवलेली चित्रे काढून द्यायचीच पण स्वतःही त्याच्या कल्पकतेने सुंदर सुदंर चित्रे काढायचा पण स्वतः मात्र वही आणत नव्हता त्याच्या सह काही मुलांना ग्रेड चित्रकला परीक्षेला बसवले व त्यांना परीक्षेची फी व्हाटर कलर ब्रश डिश आणायला सांगितल काही दिवसांनी फॉर्म फी जमा करण्यासाठी सर्वाना बोलवले पण तो मुलगा दिसला नाही मुलानकडून समजले तो मुलगा शाळेत येत नाही मला प्रश्न पडला काय झालं असावं मला काही केल्या राहवेना हा मुलगा घरी का राहतो बघण्यासाठी मी शाळा सुटल्यावर घरी न जाता त्याच्या घराकडच्या मुलांना गाडीवर बसवून त्यांना रस्ता विचारत जंगलाकडे गेलेल्या काट्यातूटयाच्या पायवाटेने गाडी सावरत त्याच्या घराकडे निघालो मला येताना पाहून तो मुलगा एका छोट्या झोपडीच्या पाठीमागे लपला मुलांनी सांगितले की तो जिथे लपला तेच त्याच घर मग त्या झोपडीजवळ जाऊन आवाज दिला घरातून त्याच्या वडिलांनी बोलवलं जमिनीवर एक गोणपाट तुकडा अंथरून बसण्यासाठी दिला वडिलांकडे नीट पाहिले ते खूपआजारी दिसले मला त्यांनी ओळखले नव्हते त्यांना सांगितले शाळेतून आलोय मुलगा शाळेत येत नाय वडिलांनी मुलाला आवाज देऊन बोलवले तेव्हा तो तेथे येऊन उभा राहिला मी विचारले शाळेत का नाय येत मान खाली घालून एक शब्द न बोलता तो तसाच उभा होता घरात इतर कोणी दिसले नाही तिथे जमलेल्या मुलांनी सांगितले की तो वडापावच्या गाडीवर कामाला जातो मला ती परिस्थिती पाहून मुलगा सुंदर चित्रे काढत असताना वही का आणत नव्हता व परीक्षेसाठी साहित्य फी सांगितल्यावर मुलगा शाळेत येण्याचा का बंद झाला ते सर्व कळून चुकले अक्षरशा रडू आलं त्याला सांगितले तुझी फी मी भरली आहे तुझ्यासाठी उद्या वही व सर्व साहित्य आणतो उद्या शाळेत ये.दुसऱ्या दिवशी मुलगा सर्वांच्या आधी शाळेत हजर त्या दिवशी त्याला ते साहित्य देताना डोळ्यात नभ दाटुन आले होते परीक्षा छान देऊन त्या मुलाला a ग्रेड मिळाली होती मनावर कोरलेल्या यातना आजवर मनात घर करून राहिल्यात असे प्रसंग दरवर्षी पहायला मिळतात त्यामुळे त्या दिवसापासून मी मुलांना माझा तुटपुंजा पगार असताना वेगवेगळ्या गावातील मुलांची फी व हवे ते साहित्य उपलब्ध करतो व वर्षभर माझ्याघरीमोफत शिकवतो.यातून जो मुलांच्या चेहऱ्यावरीलआनंद पहिला की जे समाधान मिळते ते कुठेच नाही.
Comments
Post a Comment