13 जुन माझा वाढदिवस अनोखा साजरा
13 जुन माझ्या वाढदिवसानिमित्त मित्रमंडळ परिवार पार्ट्यांसाठी बॅनरबाजी,झगमगाट खर्च करण्यापेक्षा केक थोबाडाला फासण्यापेक्षा तो खर्च गरीब गरजू मुलांच्या शिक्षणसाहित्यासाठी वापरून आज माझ्या भावासह पावसाचा वाऱ्याचा मार खात,काट्या तुटयातून विविध पाडे फिरताना गाडीनेही पंचर होऊन साथ सोडलेल्या परिस्थतीत,पावसापासून साहित्य भिजण्यापासून वाचवत पाडे खेड्यात जाऊन मुलांना भेटून त्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य वस्तू खाऊ देऊन माझा आजचा वाढदिवस आनंदात साजरा केला.त्याच बरोबर हे कार्य फक्त एका दिवसापूरत नसून गेल्या 7 वर्ष स्वखर्चीक उपक्रम सुरू असून ह्या वर्षभरातसुद्धा जास्तीत जास्त मुलांना विविध साहित्या सोबत नवीन नवीन शैक्षणिक ज्ञान शिक्षण कलाउपक्रम देण्याचा माझा प्रयत्न असेल Mahesh Kachare कलाकार महाराष्ट्र
Comments
Post a Comment