"प्राणी पक्षी निसर्गाची सेवा हीच महाईश्वरसेवा"

"प्राणी पक्षी निसर्गाची सेवा हीच महाईश्वरसेवा"
मला जंगला मध्ये फिरण्याची भारी हौस असाच फिरत हुंदडत असताना मला पाला पाचोळ्यामध्ये एक पक्षी निपचित पडलेला दिसला जवळ जाऊन पाहिलं तरीही तो पक्षी हालचाल करत नव्हता मग हात लावला तेव्हा थोडी हालचाल झाली पण त्यामध्ये उडण्याची शक्ती नव्हती त्याच्या चोचीतुन रक्त येत होतं मग त्याला उचलले व घरी आणलं पाणी पाजलं खाऊ घातलं त्यामुळे त्याला जसे फ्रेश वाटले व छान पैकी एक झेप घेत उडून गेलं.दोन तीन दिवसांनी असाच अनुभव आणखी एक पक्षी पडलेला दिसला त्याला घरी आणून त्याची देखभाल घेतली तेही छान उडाल
पण एका पक्ष्याला वाचवण्यास मी असमर्थ ठरलो बहुतेक त्याची गाडीला जोरदार धडक बसलेली असेल ते रोड वर तडफडत होत   बऱ्याचश्या  गाड्या बाजूने जात होत्या मी गाडी थांबवून त्याला उचललं पण  जसं त्याला हातात घेतलं ते शांत झालं त्याने जगाचा निरोप घेतला होता,एक ससा ही मला असाच हातामध्ये दुःखद निरोप देऊन गेला होता.मी जेव्हा सहज फेरफटका मारण्यासाठी निघतो तेव्हा एका ठिकाणी एक अनोळखी कुत्रा मी त्याच्या परिसरात गेलो की तो येऊन माझ्या अंगावर उड्या मारतो सुरुवातीला मी खूप घाबरलो होतो नंतर मला कळून चुकलं की त्याला माझ्याशी मैत्री करायचीय.जो पर्यंत मी त्या परिसरात असतो तो पर्यंत तो मला सोडत नाही तो दिवसभर माझ्या सोबत थाम्बतो,एक  मांजर ही दिवाळी मध्ये माझ्या शेजारी कंदील बनवायला येऊन बसलं त्याने आज पर्यंत माझं घर सोडलं नाय.विरार स्टेशन ला मला खारुताई सोबत मस्त वाटतं बॅग मध्ये त्यांच्या साठी 1 भिस्कीट  पुडा नेहमी ठेवतो.माझ्या घराच्या दरवाज्या समोर बरीचशी वर्षे झाली चिमण्यांचा किलबिलाट कधीच कमी झालेला नाही .लहानपणी गावातील पोर बेचकी घेऊन पाखरं मारायची पण मी त्यांच्या सोबत असताना कधीच पक्षी मारू दिला नव्हता त्यांच्या आधीच काहीतरी आवाज करायचो किंवा बाजूला दगड मारायचो त्यामुळे ते उडून जायचं.माझं निसर्ग प्रेम व इतरांचं निसर्ग प्रेम यांची देवाण घेवाण व्हावी म्हणून मी एक फेसबुक समूह सुद्धा सुरू केला आहे निसर्गरम्य महाराष्ट्र. https://www.facebook.com/groups/1964795923847320/
का कोण जाणे
हे माझं प्राण्यांवरील व प्राण्यांचे माझ्यावरील प्रेम असंच राहो ही निसर्ग देवतेला प्रार्थना.

Comments

Popular posts from this blog

महेश काचरे सरांविषयी

गरजु मुलांसाठी संगनक